World Corona Update: कोरोना संसर्गात भारत चीनच्याही पुढे, मात्र जीवितहानी मर्यादित ठेवण्यात यश

World Corona Update: India ahead of China in corona infection, but managed to limit casualties

एमपीसी न्यूज – जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना या संसर्गजन्य रोगाची सुरूवात झाली त्या चीनमधील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येला काल रात्री भारताने मागे टाकले. भारतात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी त्यासाठी लागणारा वेळ वाढविण्याबरोबरच जीवितहानी मर्यादित ठेवण्यात भारताला यश मिळाले आहे. कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत आता 11 व्या स्थानावर पोहचला असून सुरूवातीला प्रथम क्रमांकावर असलेला चीन 13 व्या स्थानावर गेला आहे.

डिसेंबर महिन्यात चीनमधील वुहान येथे कोरोना (कोविड-19) विषाणूचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर तो चीनमध्ये झपाट्याने पसरला. चीनने त्यानंतर या विषाणूचा प्रसार रोखण्यात यश मिळविले, मात्र हा विषाणू चीनमधून बाहेर पडून संपूर्ण जगभर फैलावला. या विषाणूच्या संसर्ग प्रचंड वेगाने होत असल्याने त्याने जागतिक महामारीचे रुप धारण केले.

चीनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चीनमध्ये 82,933 जणांचा कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोनाची बाधा झालेल्या 4,633 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती चीनने दिली आहे. 78,209 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून चीनमध्ये आता केवळ 91 सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत. चीन जगापासून कोरोनाबाधितांची खरी आकडेवारी जगापासून लपवत असल्याचा आरोप अमेरिकेसह अनेक राष्ट्रांनी केला आहे. त्यामुळे चीनच्या आकडेवारीपुढे प्रश्नचिन्ह कायम आहे.

भारतात कालअखेर 85,784 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. म्हणजेच चीनच्या उपलब्ध आकडेवारीपेक्षा आता ही संख्या पुढे गेली आहे. मात्र ही संख्या गाठण्यासाठी लागणारा कालावधी भारताने चार महिन्यांपेक्षा अधिक काळ लांबविणे शक्य झाले. कालअखेरपर्यंत भारतातील कोरोना बळींचा आकडा 2,753 पर्यंत पोहचला असला तरी तो चीनमधील कोरोना बळींच्या निम्म्यांपेक्षा थोडा जास्त आहे. म्हणजेच कोरोनाबाधितांच्या संख्येत भारताने चीनला मागे टाकले असले तरी जीवितहानी मर्यादित ठेवण्यात भारताला यश मिळाले आहे.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 46 लाख 28 हजार 356 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 3 लाख 08 हजार 645 (6.67 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 17 लाख 58 हजार 039 (37.98 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 25 लाख 61 हजार 672 इतके सक्रिय रुग्ण आहेत.

मागील सहा दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

10 मे – नवे रुग्ण 79 हजार 825 दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 510

11 मे – नवे रुग्ण 74 हजार 228  दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 403

12 मे – नवे रुग्ण 85 हजार 315  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 320

_MPC_DIR_MPU_II

13 मे – नवे रुग्ण 88 हजार 220  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 314

14 मे – नवे रुग्ण 96 हजार 334  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 317

15 मे – नवे रुग्ण 99 हजार 405  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 072

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या 88 हजारांच्या पुढे

अमेरिकेत शुक्रवारी 1,595 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 88 हजार 507 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 14 लाख 84 हजार 285 झाली आहे तर 3 लाख 26 हजार 242 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

ब्राझीलमध्ये काल (शुक्रवारी) 824, इंग्लंडमध्ये 384, मेक्सिकोमध्ये 257, इक्वाडोरमध्ये 256 तर इटलीमध्ये 242 कोरोनोबाधित मृत्यू नोंदविले गेले. काल स्पेन 138, पेरू 125, स्वीडन 117, रशिया 113 तर भारत व फ्रान्समध्ये प्रत्येकी 104 बळी गेले आहेत.

जागतिक क्रमवारीत भारत 11 व्या स्थानावर

कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत आणि पेरू या दोन देशांनी (गुरूवारी) वरचे स्थान मिळवले आहे. चीनला मागे टाकत भारताने 12 व्या स्थानावरून 11 वे स्थान, पेरूने 12 वे स्थान मिळविले आहे. चीन आता 13 व्या स्थानावर आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

 1. अमेरिका – कोरोनाबाधित 14,84,285 (+26,692), मृत 88,507 (+1,595)
 2. स्पेन – कोरोनाबाधित 2,74,367 (+1,721), मृत 27,459 (+138)
 3. रशिया – कोरोनाबाधित 2,62,843 (+10,598), मृत 2,418 (+113)
 4. यू. के. – कोरोनाबाधित 2,36,711 (+3,560), मृत 33,998 (+384)
 5. इटली – कोरोनाबाधित 2,23,885 (+789), मृत 31,610 (+242)
 6. ब्राझील – कोरोनाबाधित 2,18,223 (15,305), मृत 14,817 (+824)
 7. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,79,506 (636), मृत 27,529 (+104)
 8. जर्मनी – कोरोनाबाधित 1,75,699 (+724), मृत 8,001 (+73)
 9. टर्की – कोरोनाबाधित 1,46,457 (+1,708), मृत 4,055 (+48)
 10. इराण – कोरोनाबाधित 1,16,635 (+2,102), मृत 6,902 (+48)
 11. भारत – कोरोनाबाधित 85,784 (+3,787) , मृत 2,753 (+104)
 12. पेरू –  कोरोनाबाधित 84,495 (+3,891) , मृत 2,392 (+125)
 13. चीन – कोरोनाबाधित 82,933 (+4), मृत 4,633 (+0)
 14. कॅनडा –  कोरोनाबाधित 74,613 (+1,212), मृत 5,562 (+90)
 15. बेल्जियम – कोरोनाबाधित 54,644 (+356), मृत 8,959 (+56)
 16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 49,176 (+2,307) मृत 292 (+9) 
 17. नेदरलँड – कोरोनाबाधित 43,681 (+200), मृत 5,643 (+53)
 18. मेक्सिको – कोरोनाबाधित 42,595 (+2,409), मृत 4,477 (+257)
 19. चिली – कोरोनाबाधित 39,542 (+2,502), मृत 394(+26)
 20. पाकिस्तान – कोरोनाबाधित 37,218 (+1,430), मृत 803 (+33)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.