World Update: कोरोनाबाधितांची एकूण संख्या 12 लाख 73 हजार तर मृतांचा आकडा 69 हजार 428!

जगात दिवसभरात 4,736 बळी तर अमेरिकेत 1,165 बळी, जर्मनीनेही ओलांडला कोरोनाबाधितांचा एक लाखांचा टप्पा

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधितांची संख्या अधिक जास्त वेगाने वाढत असल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. जगातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने पावणेतेरा लाखांचा टप्पा गाठला आहे. एक लाखांचा टप्पा ओलांडणारा जर्मनी हा चौथा देश ठरला आहे. आज (सोमवारी) सकाळपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 लाख 72 हजार 953 इतकी झाली आहे. मृतांचा आकडा 69 हजार 428 पर्यंत वाढला आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 62 हजार 331 इतकी झाली, ही बाब थोडा दिलासा देणारी आहे. जगभरात अजून 9 लाख 41 हजार 194 इतके सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी 45 हजार 589 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. दिवसभरात जगात एकूण 4,736 बळी तर एकट्या अमेरिकेत 1,165 बळी गेले आहेत. जर्मनीनेही कोरोनाबाधितांचा एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

अमेरिकेने कोरोनाबाधितांचा सव्वातीन लाखांचा आकडा ओलांडला आहे. एकूण 3 लाख 36 हजार 673 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 9 हजार 616 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क. न्यू जर्सी, मिशीगन, कॅलिफोर्निया, ल्युसियाना, मॅसेच्युसेट्स, फ्लोरिडा, पेनसिल्वानिया, इलिनोइस, वॉशिंग्टन, जॉर्जिया, टेक्सास आदी शहरांमधील परिस्थिती गंभीर आहे. अमेरिकेत काल एका दिवसात 1,165 बळी गेले आहेत.

स्पेनमध्ये 12 हजार 641 बळी 

स्पेनने इटलीला मागे टाकत कोरोनाबाधितांच्या संख्येत दुसरा क्रमांक मिळवला आहे. स्पेनमध्ये एकूण 1 लाख 31 हजार 646 कोरोनाबाधित असून आतापर्यंत 12 हजार 641 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये काल (रविवारी) 471 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून 4 हजार 591 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

इटलीत एका दिवसात 525 बळी, दोन आठवड्यात सर्वात कमी बळी

इटलीत एकूण 1 लाख 28 हजार 948 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. इटलीत मृतांचा एकूण आकडा 15 हजार 887 पर्यंत वाढला आहे. इटलीमध्ये गेल्या 24 तासांत एकूण 525 बळी गेले असले तरी मागील दोन आठवड्यातील एका दिवसात गेलेल्या बळींमध्ये ते सर्वांत कमी आहेत. एवढीच काय ती दिलासा देणारी गोष्ट आहे. या देशांत काल दिवसभरात कोरोनाचे 4 हजार 316 नवे रुग्ण आढळून आले.

जर्मनीनेही ओलांडला कोरोनाबाधितांचा एक लाखांचा टप्पा

अमेरिका, इटली व स्पेनच्या पाठोपाठ जर्मनीनेही कोरोनाबाधित रुग्णांचा एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एक लाखपेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला हा जगातील चौथा देश ठरला आहे. जर्मनीतील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 123 झाला आहे. जर्मनीत आतापर्यंत 1 हजार 584 कोरोनाबाधित मृत्युमुखी पडले आहेत. फ्रान्समध्ये 92 हजार 839 कोरोनाचे रुग्ण असून आतापर्यंत एकूण 8 हजार 78 बळी गेले आहेत. इंग्लंडमध्ये काल दिवसभरात 621 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून नवीन 5 हजार 903 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये एकूण रुग्णसंख्या 47 हजार 806 तर मृतांची संख्या 4 हजार 934 झाली आहे.

चीनमधील परिस्थिती आता नियंत्रणाखाली

चीनने कोरोनाचा प्रसार व बळींची संख्या दोन्हींवर नियंत्रण मिळविले असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. कोरोनाची लागण सुरू झाली त्या चीनमध्ये आतापर्यंत 81 एकूण 708 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. दिवसभरात केवळ 39 नवे रुग्ण आढळले तर मृतांमध्ये दोनची वाढ झाली आहे. ही काहीसा दिलासा देणारी गोष्ट आहे. आतापर्यंत 3 हजार 331 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झालेल्या इतर देशांमधील कोरोनाबाधिताची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसात मृतांचे आकडे दिले आहेत.

इराण – 58,226 (3602)

टर्की – 27,069 (574)

स्वित्झर्लंड  – 21,100 (715)

बेल्जियम – 19,691 (1447)

नेदरलँड – 17,851 (1,766)

कॅनडा – 15,512 (280)

ऑस्ट्रीया – 12,051 (204)

ब्राझील – 11,281 (487)

पोर्तुगाल – 11,278 (295)

दक्षिण कोरिया – 10,237 (183)

इस्राईल – 8,430 (49)

स्वीडन – 6,830 (401)

ऑस्ट्रेलिया – 5,750 (37)

नॉर्वे – 5,687 (71)

रशिया -5,389 (45)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.