Alandi: मद्यपीकडून तरुणाला कुदळीने मारहाण

Young man beaten with a spade by an drunken man in alandi

एमपीसी न्यूज- शाब्दिक वादातून झालेल्या भांडणातून एकाने तरुणाला कुदळीने मारून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि.26) सायंकाळी आळंदी येथे घडली.

सचिन सुभाष घुंडरे (वय 31) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सचिन यांची आई नंदा सुभाष घुंडरे (वय 45, रा. आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मयूर प्रभाकर कुऱ्हाडे (वय 30, रा. कुऱ्हाडे आळी, आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सचिन दिवसभर घरी आला नाही. त्यामुळे सचिनची आई नंदा या त्याला शोधण्यासाठी शेतात गेल्या. तिथे सचिन आणि आरोपी मयूर यांच्यात शाब्दिक वाद सुरू होता. त्यामुळे नंदा या सचिनला घेऊन घरी निघाल्या. त्यानंतर संशयित आरोपी मयूर हा दारूच्या नशेत कुदळ घेऊन आला. त्याने सचिनला डोक्यात कुदळ मारून गंभीर जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.