Congress Morcha: खासदार राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ  युवक काँग्रेसने काढला मशाल मोर्चा; केंद्र सरकारचा केला निषेध

एमपीसी न्यूज –  राष्ट्रीय काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा खासदार सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने चौकशीच्या फेऱ्यात अडकविले आहे. हा प्रकार म्हणजे काँग्रेसची आणि  गांधी कुटूंबियांची बदनामी करण्याचा प्रकार आहे, असा आरोप करत युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि. 17) सायंकाळी चिंचवड येथील चापेकर चौकात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत मशाल मोर्चा (Congress Morcha)  काढण्यात आला.

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कौस्तुभ नवले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मशाल मोर्चात (Congress Morcha) महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व पिंपरी चिंचवडचे निरीक्षक अक्षय जैन, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, स्वप्निल बनसोडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, सरचिटणीस विनिता तिवारी, गौरव चौधरी, सौरभ शिंदे, वसीम शेख, विशाल कसबे, एनएसयूआय प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, रोहित तिकोने, जीफिन जॉन्सन, रोहित भाट, मयुर रोकडे, अथर्व माने, आशुतोष नार्वेकर, गणेश शितोळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.