Youth Kidnapped : व्याजाच्या पैशातून अपहरण केलेल्या तरुणाची चार तासात सुटका

 एमपीसी न्यूज – व्याजाने घेतलेले पैसे परत करत नसल्याच्या कारणाहून अपहरण झालेल्या तरुणाची (Youth Kidnapped) चिखली पोलिसांनी अवघ्या चार तासात सुटका केली. एवढेच नाही तर अपहरण करून खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देणा-या तीन आरोपींनाही पोलिसांनी बेड्या टोकल्या.

चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुर्णानगर येथे गुरुवारी (दि.16) दुपारी चार वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी अपहृत (Youth Kidnapped) तरुणाच्या वडिलांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी कारवाई करत गौतम नवनाथ सोनवणे (रा. संभाजीनगर), मयूर रामपूरे,  अब्दुल चौधरी यांना अटक केली आहे.

Pimpri Corona Update: शहरात आज 99 नवीन रुग्णांची नोंद, 50 जणांना डिस्चार्ज

 

चिखली पोलिस ठाण्याचे फौजदार किरण कणसे आणि विवके कुमटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 25 वर्षीय मुलगा आहे. त्याने आरोपी गौतम याच्याकडून व्याजाने 50 हजार रुपये घेतले होते. मात्र, त्याने ते परत केले नसल्याचे गौतमचे म्हणणे आहे. गुरुवारी दुपारी चार वाजता हा तरुण आपल्या मावस भावाबरोबर रस्त्याने पायी चालत असताना एका चंदेरी रंगाच्या चारचाकी वाहनात येऊन आरोपींनी तरुणाला बळजबरीने मोटारीत नेले.

तरुणाचे अपहरण केल्यानंतर गौतम नावाच्या आरोपीने तरुणाच्या वडिलांशी संपर्क साधला. तुम्ही जर एका तासात 1 लाख 40 हजार रुपये घेऊन अजंठानगर येथे आला नाही, तर तुमच्या मुलाचे तुकडे करेल, अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर तरुणाच्या वडिलांनी चिखली पोलिस धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत लगेचच तपासाची सुत्रे हलविली. मोबाईल लोकेशन शोधून आरोपींच्या मागावर पोलिसांची दोन पथके पाठवित आरोपींना जेरबंद केले. तरुणाची सुखरुप सुटका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.