Yuva sena News : लॉकडाऊनमध्ये युवासेनेचा ‘मदत यज्ञ’; गरजुंना अन्नदानासह सर्व प्रकारचे साहाय्य

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे व राज्यात सुरु असलेल्या लॅाकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता आरोग्य सुविधांसाठी झगडत असतानाच छोटे -मोठे व्यवसाय आणि रोजगार बंद असल्यामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात सापडली आहे. या गोरगरिबांना दिलासा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड व मावळ विधानसभेतील युवासैनिक पुढे सरसावले आहेत. युवा सैनिकांचा हा मदत यज्ञ अविरतपणे सुरु आहे. 

कोणतेही संकट आले की शिवसेनेचे कार्यकर्ते मदतीसाठी सर्वात पुढे असलयाचे आपण नेहमी ऐकतो. आताही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शिवसैनिकांसह युवा सैनिकही जनतेच्या सेवेसाठी त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता रस्त्यावर उतरून शक्य ती मदत करताना पाहायला मिळत आहे.

यामध्ये कोणी रुग्णांना बेड, प्लाज्मा, इंजेक्शन मिळवून देण्यासाठी धावपळ करतोय, तर कोणी ॲम्बुलन्सची मिळवून देण्यासाठी ते कुणी रुग्णालयातील वाढीव बिले कमी करण्यासाठी झटतोय. निराधार कोरोना मृतदेहांच्या अंत्यविंधीची व्यवस्था लावण्यासाठी सुद्धा युवा सैनिकांची धावाधाव सुरु आहे.

युवासेना विस्तारक व मावळ लोकसभा संपर्क प्रमुख राजेश पळसकर यांनी पुणे शहरात 700 कुटुंबाना अन्नधान्य किट वाटप करत सेवाकार्यात सहभाग घेतला.

चिंचवड विधानसभेतील पदाधिकारी राजेंद्र तरस यांनी किवळे -विकासनगरमधील गरजुंसाठी अविरत अन्नछत्र सुरु केले आहे. दहा हजार नागरिकांना अन्नदान करण्याचा संकल्प तरस यांनी केला होता. गेल्या 27 दिवसांपासून आजपर्यंत दहा हजारांहून अधिक नागरिकांनी अन्नछत्राचा लाभ घेतला. त्यामुळे तरस यांची संकल्पपूर्ती झाली. मात्र, लॉकडाऊन संपेपर्यंत अन्नछत्र सुरु ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

युवासेना चिंचवड विधानसभा अधिकारी विश्वजीत बारणे यांनी नुकतेच थरगाव आणि परिसरातील 500 गोरगरीब कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप केले. संकट काळात त्यांनी केलेली मदत नागरिकांसाठी मोलाची ठरली.

चिंचवडमध्ये युवासैनिक माऊली जगताप हे बॅचलर तरुण व विद्यार्थ्यांसाठी जेवणाचा डबा देण्याचा उपक्रम राबवित आहेत.

युवा सेनेचे मावळ तालुका अधिकारी अनिकेत घुले व विशाल दांगट यांनीसुद्धा अन्नधान्य किट वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. देहुरोड कॅन्टोन्मेंट परिसरात विशाल दांगट हे गेल्या पाच दिवसांपासून निराधार व गोरगरीब कुटुंबांना फळ वाटप व अन्नदान करीत आहेत.

तसेच पिंपरी विधानसभेत निलेश हाके हे सुद्धा गरजूंना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू पुरवित आहेत.

राज्याचे पर्यावरणमंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासैनिकांना गरजु नागरिकांना दिलासा देण्यासाठी सामाजिक उपक्रम राबविण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करीत पिंपरी चिंचवड आणि मावळमधील युवासैनिक मदतीसाठी सज्ज झाला.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत युवासैनिकांनीही मदत कार्यात खारीचा वाटा उचलत मदत यज्ञ सुरु केला आहे. आगामी काळात या सेवा कार्याची व्याप्ती आणखी वाढविण्यात येणार आहे. राजेश पळसकर : युवासेना विस्तारक व मावळ लोकसभा संपर्क प्रमुख.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.