Pune News : राजीव गांधी प्राणी संग्रहालयात झेब्रा आणि चौशिंगा खंदक

एमपीसी न्यूज – कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात झेब्रा आणि चौशिंगा खंदक उभारण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, झेब्रा खंदकासाठी सुमारे 1 कोटी 13 लाख रुपये आणि चौशिंगा खंदकासाठी सुमारे 1 कोटी 5 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. दोन्ही खंदक केंद्रीय प्राणीसंग्रहालयाच्या निकषांनुसार उभारण्यात येणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.