Pimpri : वीज मीटरच्या रिडींगचे फोटो स्पष्ट घेण्याची मागणी

एमपीसी न्यूज- वीज मीटरचे फोटो दुरून घेतल्यामुळे अस्पष्ट येतात. त्यामुळे ग्राहकांना वीज बिलावरील रिडींगचा फोटो स्पष्ट दिसत नाही. अनेकदा वीज बिलामध्ये तफावत येऊन वीज ग्राहकांना त्याचा फटका बसतो. त्यामुळे वीज बिलाचे फोटो व्यवस्थित दिसेल असे घ्यावेत अशी मागणी भाजप यूवा मोर्चा सोशल मिडीया उपाध्यक्ष दीपक गुप्ता यांनी महावितरणकडे केली आहे.

कुदळवाडी येथे वीज मीटरचे रिडींग घेण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याकडून वीज मीटरचा फोटो दुरून घेत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ग्राहकांना रिडींगचा एकदा स्पष्ट दिसत नाही. अनेकदा ग्राहक वीज कमी वापरात असताना देखील भरमसाठ बिल येऊन त्याचा वीज ग्राहकांना त्याचा फटका बसतो. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.