बहुसदस्यीय प्रभाग पद्धत भाजपाच्या पथ्यावर; पिंपरीत भाजपचे 11 पॅनल विजयी

राष्ट्रवादीचे 2 पॅनल विजयी

एमपीसी न्यूज – बहुसदस्यीय निवडणूक घेणे भाजपच्या पथ्यावर पडले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे 11 पॅनल  निवडून आले असून ‘पॅनल  टू पॅनल’ मध्ये भाजपची सरशी झाली आहे. तर, 5 पॅनलमधून भाजपचे तीन-तीन  उमेदवार, 7 पॅनल मधून दोन-दोन आणि 4 पॅनलमधून एक उमेदवार भाजपचा विजयी झाला आहे.

तर राष्ट्रवादीचे 2 पॅनल  निवडून आले आहेत. 4 पॅनलमधून तीन-तीन उमेदवार, 4 पॅनलमधून दोन-दोन उमेदवार आणि 8 पॅनलमधून एक-एक उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेनेचा संपूर्ण एकही पॅनल  विजयी झाला नाही. एका पॅनलमधून शिवसेनेचे तीन उमेदवार आणि दोन पॅनलमधून दोन-दोन उमेदवार तर, दोन पॅनलमधून एक-एक उमेदवार निवडून आले आहेत.

भाजपचे प्रभाग क्रमांक 2 मोशी-जाधववाडी, प्रभाग 7 सँडवीक कॉलनी, भोसरी गावठाण, प्रभाग 19 उद्योगनगर, आनंदनगर, भाटनगर, एम्पायर एस्टेट, प्रभाग क्रमांक 26 पिंपळे-निलख, विशालनगर, प्रभाग 27 तापकीरनगर, श्रीनगर, प्रभाग क्रमांक 4 दिघी-बोपखेल, प्रभाग क्रमांक 6 धावडेवस्ती-भगतवस्ती, प्रभाग क्रमांक 11 कृष्णानगर, पुर्णानगर, प्रभाग क्रमांक 17 वाल्हेकरवाडी, चिंचवड, बिजलीनगर, प्रभाग 29 पिंपळेगुरुव, वैदूवस्ती, प्रभाग क्रमांक 32 सांगवी गावठाण हे भाजपचे पॅनल विजयी झाले आहेत.

प्रभाग क्रमांक 3 मोशी-गावठाण, प्रभाग 8 इंद्रायणीनगर, प्रभाग 10 शाहूनगर, संभाजीनगर, मोरवाडी, प्रभाग 23 शिवतीर्थनगर, समर्थनगर, प्रभाग 31 राजीव गांधीनगर, गजानन महाराजनगर या पॅनलमधून भाजपचे तीन-तीन उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग 1 चिखली, प्रभाग 13 निगडी गावठाण, प्रभाग 15 आकुर्डी-प्राधिकरण, प्रभाग 5 गवळीनगर, प्रभाग 16 मामुर्डी-किवळे, रावेत, प्रभाग 18 चिंचवड गावठाण, प्रभाग 28 शिवार गार्डन, कापसे लॉन्स, कुणाल आयकॉन या प्रभागातून भाजपचे दोन-दोन उमेदवार निवडून आले आहेत.  प्रभाग 20 संत तुकारामनगर, प्रभाग 21 पिंपरीगाव, प्रभाग 24 थेरगाव, प्रभाग 30 दापोडी या चार पॅनेल मधून भाजपचा एक उमेदवार निवडून आला आहे.

राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर, तळवडे आणि  प्रभाग क्रमांक 9 मासुळकर कॉलनी हे पॅनल निवडून आले आहे. प्रभाग 20 संत तुकारामनगर, प्रभाग 21 पिंपरीगाव, प्रभाग 22 विजयनगर, काळेवाडी, प्रभाग 30 दापोडी पॅनल मधून राष्ट्रवादीचे तीन-तीन उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग 14 काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, प्रभाग 5 गवळीनगर, प्रभाग 16 मामुर्डी, किवळे, रावेत, प्रभाग 28 शिवार गार्डन, कापसे लॉन्स, कुणाल आयकॉन या प्रभागातून राष्ट्रवादीचे दोन-दोन उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग 1 चिखली, प्रभाग 3 मोशी, प्रभाग 8 इंद्रायणीनगर, प्रभाग 13 निगडी, प्रभाग 15 आकुर्डी-प्राधिकरण, प्रभाग 25 पुनावळे, भूमकरवस्ती, प्रभाग 10 शाहूनगर, संभाजीनगर, प्रभाग 18 चिंचवड गावठाण या आठ प्रभागतून राष्ट्रवादीचा एक-एक उमेदवार निवडून आला आहे.

शिवसेनेचे प्रभाग 25 पुनावळे, भूमकरवस्ती या प्रभागातून तीन उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग 14 काळभोरनगर, आकुर्डी आणि प्रभाग 24 थेरगाव या प्रभागातून दोन-दोन उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग 15 आकुर्डी आणि प्रभाग 18 चिंचवड गावठाणातून शिवसेनेचा एक उमेदवार निवडून आला आहे.

भाजपचे तब्बल 11 पॅनेल विजयी झाले आहेत. त्यामुळे बहुसदस्यीय पद्धतीचा भाजपाला फायदा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.