Pune : सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयास गणेशोत्सवानिमित्त अन्नधान्याची मदत

एमपीसी न्यूज- सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालय पिंपळे जगताप ( ता .शिरुर ) या संस्थेस ललीत कावेडिया कुटुंबीयांकडून गणेशोत्सवानिमित्त धान्य, सतरंज्या, दैनंदिन उपयोगाच्या वस्तुंची मदत करण्यात आली. दीडशे किलो तांदुळ, 60 किलो डाळी, 30 किलो गोडेतेल याचा समावेश आहे. यावेळी ललीत कावेडिया, मीना कावेडिया,रेयांश कावेडिया,रिया कावेडिया उपस्थित होते.

पुण्याच्या घरगुती गणेशोत्सवाला समाजसेवेचा नवा आयाम देत ललित कावेडिया, मीना कावेडिया कुटुंबियांच्या घरी गणेशसेवा सुरु आहे . लुल्लानगर येथील कावेडिया कुटुंबाच्या घरी गणेशोत्सव एखाद्या सार्वजनिक गणपती मंडळाच्या तोडीस तोड असतो. गरीब ,दिव्यांग ,अनाथ आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची सेवा,आदरातिथ्य हे कावेडया यांच्या घरगुती गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे . कावेडिया यांच्याकडे 11 दिवसांचा उत्सव असतो.

यात त्यांनी 4, 5 सप्टेबर रोजी सूर्योदय सोशल फाऊंडेशनची 200 बालके आणि जनसेवा फाऊंडेशनच्या वृद्धाश्रमातील शंभर ज्येष्ठांना घरी बोलवून गणेश दर्शनाच्या निमित्ताने सन्मान ,आदरातिथ्य केले. भोजन दिले. दंत तपासणी .,कपडेवाटप,असे उपक्रम आयोजित केले आहेत. 7 तारखेला सेवाधाम संस्थेच्या दिव्यांग बालकांना भोजन आणि आदरातिथ्य साठी त्यांनी निमंत्रित केले आहे . वानवडी ,कोंढवा भागातील बालकांना त्यांनी निमंत्रित केले आहे. 25 वर्षापासून हा उत्सव चालू आहे. या वर्षी कावेडिया कुटुंबीयांनी शिर्डी साईबाबा मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे. ती कौतुकाचा विषय झाली आहे. या सर्व गणेशसेवेत ललीत कावेडिया यांच्या समवेत मीना कावेडिया, रिया कावेडिया, रेयांश कावेडिया या सर्वांची मदत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.