Hadapsar : राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांच्या रॅलीला भाजपच्या सनी देओल ‘रोड शो’ मधून उत्तर

एमपीसी न्यूज- विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. हडपसर मतदार संघात भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे आणि मनसेचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत आहे. योगेश टिळेकर यांच्या प्रचारासाठी बॉलिवूड अभिनेते खासदार सनी देओल मैदानात उतरले आहेत. या मतदार संघात त्यांची आज, मंगळवारी रॅली आयोजित करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने अभिनेते, खासदार डॉ अमोल कोल्हे यांना प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. हडपसर मतदार संघातील अनेक प्रभागात डॉ. कोल्हे यांची रॅली काढण्यात आली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचारासाठी सोमवारी राज ठाकरे यांची सभा पार पडली. तर भाजपने आज अभिनेते खासदार सनी देओल यांची रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. एकूणच या मतदार संघात ‘स्टारवॉर’ पहायला मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.