India Corona Update : गेल्या 24 तासांत 12 हजार 059 नवे रुग्ण, रिकव्हरी रेट 97.19 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 059 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. देशात सध्याच्या घडीला 1 लाख 48 हजार 766 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.19 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

आरोग्य मंत्रालाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 08 लाख 26 हजार 363 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 05 लाख 22 हजार 601 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 11 हजार 805 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 20 कोटी 13 लाख 68 हजार 378 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 6 लाख 95 हजार 789 नमून्यांची तपासणी शनिवारी (दि.6) करण्यात आली आहे.

 

गेल्या 24 तासांत देशभरात 78 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 54 हजार 996 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.43 टक्के एवढा आहे‌. तर, रिकव्हरी रेट 97.17 टक्के एवढा झाला आहे.

देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली त्यापासून आतापर्यंत 57 लाख 75 हजार 322 जणांचे लसीकरण झाले आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.