Vadgaon Maval : मावळ पंचायत समिती राष्ट्रवादी गटनेतेपदी साहेबराव कारके

एमपीसी न्यूज- मावळ पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी साहेबराव नारायण कारके यांची निवड करण्यात आली.

मावळ पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य होते. यापूर्वी गटनेतेपदी दत्तात्रय शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु शेवाळे यांनी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने विशेष सभा घेऊन गटनेतेपदावरून शेवाळे यांना दूर करून त्याजागी साहेबराव कारके यांची निवड करण्याचा ठराव केला.

त्यानुसार कारके यांच्या नियुक्तीसाठी जिल्हाधिका-यांकडे मागणी करण्यात आली होती. निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ जयश्री कटारे यांनी गटनेतेपदी निवड झाल्याचे गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन कळविले आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like