बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत फातिमा इलेव्हन, डेक्कन रोव्हर्स संघांचा विजय

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा फुटबॉल संघटना(पीडीएफए) आयोजित डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात फातिमा इलेव्हन, डेक्कन रोव्हर्स ब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.   

पीडीएफएच्या ढोबरवाडी येथील फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत क गटात ऑल्विन ज्ञानप्रकाश (4,30,48 मि.) याच्या हॅट्ट्रिक कामगिरीच्या जोरावर फातिमा इलेव्हन संघाने गनर्स एफसीचा 3-0 असा सहज पराभव केला. तेज खाडिका याने नोंदविलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर डेक्कन रोव्हर्स बी संघाने बिशप्स एफसी कोल्टसचा 1-0 असा पराभव केला.
 
अन्य लढतीत सिटी क्लब व राहुल एफसी यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. अ गटात खडकी ब्लू संघाने रुपाली एससी संघाला गोलशून्य बरोबरीत रोखले.  

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: प्रथम श्रेणी गट:

गट क: फातिमा इलेव्हन: 3(ऑल्विन ज्ञानप्रकाश 4,30,48मि.)वि.वि.गनर्स एफसी: 0;

गट क: डेक्कन रोव्हर्स ब:1(तेज खाडीका 10मि)वि.वि.बिशप्स एफसी कोल्टस: 0;

गट क: सिटी क्लब: 0 बरोबरी वि.राहुल एससी: 0;

गट अ: खडकी ब्लू: 0 बरोबरी वि.रुपाली एससी: 0.  

spot_img
Latest news
Related news