Pune : जिल्ह्यातील 21 मतदारसंघांत 246 उमेदवार रिंगणात; जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघांत 246 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्यावेळी एकूण 373 उमेदवार होते. त्यातील 127 उमेदवारांनी माघार घेतली. सर्वात जास्त उमेदवार पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात आहेत. तर, पिंपरी मतदारसंघात 18 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी डबल ईव्हीएम लागणार आहेत. सर्वात कमी 6 उमेदवार आंबेगाव मतदारसंघात आहेत.

जुन्नर 11, आंबेगाव 6, खेड – आळंदी 9, शिरूर 10, दौंड 13, इंदापूर 15, बारामती 10, पुरंदर 11, भोर 7, मावळ 7, चिंचवड 11, पिंपरी 18, भोसरी 12, वडगावशेरी 12, शिवाजीनगर 13, कोथरूड 11, खडकवासला 7, पर्वती 11, हडपसर 14, पुणे कॅन्टोन्मेंट 28, कसब पेठ 10 असे एकूण 246 उमेदवार रिंगणात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.