JK Encounter : जम्मू काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद

एमपीसी न्यूज – जम्मू काश्मीरमधील पुंछ भागात आज (सोमवार, दि.11) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे पाच जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एका ज्युनियर कमिशंड अधिकारी (JCO) व चार सैनिकांचा समावेश आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, भारतीय सुरक्षा दलाला पुंछ मधील सुरनकोटच्या डेरा की गली गावात काही दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर सुरक्षा दलाने या भागाला घेराव घालत शोध मोहिम सुरू केली. याच दरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार केला. यात 4 जवानांसह एक कनिष्ठ अधिकारी (JCO) जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांनी रस्त्यातच अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, अजूनही हे ऑपरेशन सुरू असून, सैन्याने हा पूर्ण परिसर सील केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.