India Corona Update : चोवीस तासांत 58,077 नवे कोरोना रुग्ण, दीड लाख कोरोनामुक्त 

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत देशभरात 58,077 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 1,50,407 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट देखील चार टक्क्यांच्या खाली आला असून, 3.89 टक्के एवढा झाला आहे. 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 4 कोटी 25 लाख 36 हजार 137 एवढी झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 13 लाख 31 हजार 158 रूग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.16 टक्के एवढा झाला आहे.

देशातील ॲक्टिव्ह रूग्णसंख्या घटली असून, सध्या देशात 6 लाख 97 हजार 802 ॲक्टिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 657 कोरोना रुग्ण दगावले असून, आजवर 5 लाख 07 हजार 177 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.19 टक्के एवढा झाला आहे.

ICMR च्या आकडेवारी नुसार आजवर 74 कोटी 61 लाख 96 हजार 071 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 15.11 नमूने तपासण्यात आले आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 171 कोटी 79 लाख 51 हजार 432 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.