Bhosari Crime News : मोशी, कासारवाडी मधून 60 लिटर गावठी दारू जप्त

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी पोलिसांनी मोशी परिसरात दोन ठिकाणी कारवाई करून 25 लिटर गावठी दारू तर दुसऱ्या घटनेत भोसरी पोलिसांनी कासारवाडी येथे कारवाई करून 35 लिटर गावठी दारू जप्त केली. याबाबत एमआयडीसी भोसरी आणि भोसरी पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

श्री संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल जवळ मोशी येथे एमआयडीसी भोसरी पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेवर कारवाई केली. त्यामध्ये पोलिसांनी 250 रुपयांची पाच लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली असून महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हवालदार वस्ती, मोशी येथे इंद्रायणी नदी जवळ एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दुसरी कारवाई केली. एका महिलेकडून पोलिसांनी एक हजारांची 20 लिटर हातभट्टीची दारू जप्त केली असून या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी एका घटनेत, भोसरी पोलिसांनी कासारवाडी येथे रेल्वे गेट जवळ कारवाई करत दोन हजार 505 रुपये किमतीची 35 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त केली. याप्रकरणी राजेश गुरुनाथ माशाळकर (वय 36, रा. भोसरी) याच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.