Varasgaon Dam News : वरसगाव धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रामध्ये 6110 क्युसेक विसर्ग चालू  

एमपीसी न्यूज – वरसगाव धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रामध्ये सुरू असणाऱ्या 3234  क्युसेक्स विसर्गमध्ये वाढ करून सकाळी 5.00 वा.सांडव्याद्वारे 5540 क्युसेक्स व विद्युत निर्मिती केंद्राद्वारे 570 क्यूसेक्स, एकूण नदी पात्रामध्ये 6110 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे,असे यो.स.भंडलकर, सहाय्यक अभियंता खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी सांगितले.

तसेच आवश्यकतेनुसार विसर्गमध्ये बदल संभवू शकतो.नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे भंडलकर यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.