Pune – ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दोनशे रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

एमपीसी न्यूज – पोलीस पडताळणी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून 200 रुपयांची लाच स्वीकारताना विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. 20) ही कारवाई केली

उत्तम जनार्दन गट(वय 38) असे लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. आरोपी उत्तम गट हे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी रिक्षा चालवण्यासाठी बॅच काढला होता त्यासाठी त्यांना पोलीस पडताळणी ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. फिर्यादी शनिवारी (दि. 18) हे प्रमाणपत्र घेण्यासाठी विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथे गेले असता त्यांना प्रमाणपत्रासाठी पाचशे रुपयांची लाच मागण्यात आली.

तक्रारदाराने रिक्षा चालवण्यासाठी बॅच काढला होता. त्यासाठी पोलीस पडताळणी ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. तारार्दार शनिवारी या कामासाठी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात आला असता आरोपी गट यांनी त्यांच्याकडे 500 रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर 200 रुपये लाच देण्याचे निश्चित झाले. तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. सोमवारी तक्रारदाराकडून ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपीस रंगेहाथ पकडले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कोणत्याही शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.