सोमवार, सप्टेंबर 26, 2022

Warje : वारजे येथे 700 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यास हिरवा कंदील

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्य सरकारने वारजे (Warje) येथे 700 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यास हिरवा कंदील दिला आहे. येथे सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर रुग्णालय उभारण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती पुणे महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली.

वारजे येथे (Warje) पीपीपी तत्त्वावर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याच्या प्रस्तावाला स्थायी समिती आणि पालिकेच्या महासभेने मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारनेही मान्यता दिली असून यासंदर्भातील आदेशही  12 ऑगस्ट रोजी देण्यात आले आहेत. या रुग्णालयाच्या बांधकामासाठी 350 कोटी रुपये खर्च येणार असून ते पीपीपी तत्त्वावर बांधले जाईल आणि चालवले जाईल, अशी माहिती कुमार यांनी दिली.

ते म्हणाले, की “कोविड-19 नंतर शहरात आरोग्य उपचार सुविधांची गरज स्पष्टपणे दिसून आली. पुणे महानगरपालिकेला आवश्यक असलेल्या मर्यादित मनुष्यबळामुळे, वारजे येथे महापालिकेच्या आरक्षित जागेवर पीपीपी तत्त्वावर 700 खाटांचे रुग्णालय बांधून ते चालविण्याचा निर्णय घेण्यात आला, पीपीपी तत्वावर चालणारे हे पहिले रुग्णालय असेल. असेही ते म्हणाले.

PCMC News: महापालिकेकडून स्वातंत्र्य दिनानिम्मिताने मुख्य इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई

spot_img
Latest news
Related news