Pune : संजय नहार यांना प्रा. रामकृष्ण मोरे जीवन गौरव पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज- रामकृष्णहरि कृषी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा प्रा. रामकृष्ण मोरे जीवन गौरव पुरस्कार यंदा सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी (दि. 2) पुण्यात एस.एम. जोशी सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता पुरस्कार सोहळा होणार आहे.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर असणार आहेत. प्रमुख पाहुणे संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे कुलुगरु पी. डी. पाटील, प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे आदी उपस्थित राहणार आहेत.

जगद्गुरू संत तुकोबारायांची पगडी, उपरणे, गाथा, तुळशीचे रोप, मानपत्र आणि रोख 25 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाचे आयोजन रामकृष्णहरि कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरीश चिकणे, अभिनंदन थोरात, सचिव मीरा चिकणे, उपाध्यक्ष नारायण मुरकुटे, नाथाभाऊ कुदळे आदींनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.