Chinchwad : दोन दिवसीय देशव्यापी संपामध्ये टपाल कर्मचाऱ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज- देशपातळीवरील संयुक्त कृती समितीच्या आदेशानुसार देशातील सर्व कामगार आजपासून (मंगळवार) दोन दिवसीय संपामध्ये सहभागी झाले आहेत. पिंपरी-चिंचवड तसेच पुणे शहरातील सर्व टपाल कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत.

या देशव्यापी संपामध्ये नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्पलॉइज,नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्पलॉइज,नॅशनल युनियन ऑफ मैल मोटर सर्विस, नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक, नॅशनल फेडरेशन ऑफ पोस्टल एम्पलॉइज इत्यादी टपाल कामगार संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला

पिंपरी-चिंचवड तसेच पुणे शहरातील सर्व टपाल कर्मचारी आज चिंचवड येथे जमले. या ठिकाणी के एस पारखी, डी आर देवकर, राजू करपे, बी पी मराठी, एस जी डुंबरे, अक्षय मिंढे, एस बी कारले, रमेश कांबळे इत्यादी नेत्यांनी मार्गदर्शन केले व विष्णु गायकवाड यांनी आभार मानले. या कार्यक्रमास पी एस हजारे, भरत बागडे, जयदेव थोरात, प्रकाश सोंडकर, कृष्णा केंगार, सर्जेराव ठोंबरे, एम व्ही बोरकर असे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

टपाल खात्यांमध्ये रिक्त जागा न भरता एका कर्मचाऱ्याला दोन कर्मचाऱ्याचे काम देऊन शारीरिक व मानसिक त्रास सरकार देत आहे. खात्यामध्ये नवीन आलेल्या संगणक प्रणालीमधील त्रुटींमुळे कामगार व ग्राहक यांच्यात वाद होत आहेत त्यामुळे कामगार व ग्राहक दोघांनाही मानसिक तसेच शारीरिक त्रास होत आहे.

सर्व प्रकारच्या रिक्त जागा भरण्याचे काम इतर संस्थानांना न देता खात्याने स्वतः भराव्यात, नवीन पेन्शन ऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करावी, ग्रामीण डाक सेवकांना खात्याच्या कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा द्यावा, सी जी एच एस उपचारासाठी कॅशलेस सुविधा द्यावी, सर्व कंत्राटी कामगारांना खात्यात कायम करावे, सर्व कर्मचाऱ्यांना पाच प्रमोशन देऊन प्रमोशनसाठीचा व्हेरी गुड बेंचमार्क रद्द करावा, टपाल खात्याचे खासगीकरण थांबवावे, इंटरनेट सुविधा सुधाराव्यात या मागण्या करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.