Crime News : उकसान धरणाच्या बंधाऱ्यावरून 86 लोखंडी प्लेट चोरीला

एमपीसी न्यूज – कामशेत येथील उकसान धरणाच्या बंधाऱ्यावरून चोरट्यांनी 86 लोखंडी प्लेट चोरून नेल्या आहेत.ही चोरी बुधवारी (दि.31) सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली.

याप्रकरणी गबळु किसन कोंढरे (वय 42 रा.येवलेवाडी) यांनी कामशेत पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कामशेत येथे इंद्रायणी नदीवर असलेल्या उकसान हे धरण आहे.या धरणाच्या माऊलीनगर येथील बंधाऱ्यावरच्या 86 हजार रुपयांच्या 86 लोखंडी प्लेट चोरट्याने नेल्याचे बुधवारी उघडकीस आले.यातील प्रत्येक प्लेट ही 50 किलो वजनाची होती.यावरून कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.