Pimpri : शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, झुलवा पाळणा बालशिवाजीचा उपक्रम

एमपीसी न्यूज – रक्तदान शिबिर, झुलवा पाळणा बालशिवाजीचा आदी उपक्रमांनी पिंपरी-चिंचवड शहरात शिवजयंती साजरी करण्यात आली. सांगवी, शिंदेनगर येथील अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर हा विधायक उपक्रम राबविण्यात आला यात ५० तरुणांनी रक्तदान केले.

मंडळाचे अध्यक्ष अमर थोपटे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते कुणाल भोसले, शुभम कडलक, हर्षवर्धन कुदळे, विकास सोनकर, अक्षय आगळे, राहूल रामदास उपस्थित होते. रेड प्लस रक्त पेढीच्या डॉ. संदिप सांगळे, डॉ. सोमया अत्तार यांचे सहकार्य लाभले.

शिवजयंती सणाप्रमाणे साजरी व्हावी व शिवविचार प्रत्येकाच्या मनामनात रूजावे या हेतूने मनकर्णिका महिला महासंघाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन महिला पो.काॅ. वैशाली बोरकर, पो.काॅ. सरस्वती वाघमारे, पो.काॅ. वर्षा मलघे व महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा वीणा करंड़े यांच्या हस्ते करण्यात आले.

पाळणा सजवून ‘झुलवा पाळणा बालशिवाजीचा ‘ हे पाळणागीत सादर करण्यात आले. शारदा थोरात व राधा बनकर यांनी मनोगत व्यक्त केले. शौर्यवी वशिष्ठ हिने ‘आम्ही जिजाऊंच्या मुली’ हे गीत सादर केले. ऐश्वर्या करंड़े हिने सूत्रसंचालन केले व शिवगर्जना दिली. यावेळी पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

तसेच दुचाकीवरून महिलांची रॅली व टेम्पोमध्ये पाळण्यासह जिजाऊमाता आणि इतर व्यक्तीरेखा व संघाच्या महिला अशी रॅली काढण्यात आली. कार्यक्रमासाठी महिला पोलीस निरिक्षक कुंदा गावडे, पोलीस निरिक्षक भानुदास जाधव व प्रशांत वाबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सायली वसिष्ठ, सारिका काळोखे, नलिनी नवगिरे, दीपिका थोरात, अनिता भेगडे व इतर महिला वर्गाने सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.