Pimpri : पिंपरीगावातील श्री काळभैरवनाथ मंदिराचा जिर्णोध्दार होणार

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नूतनीकरण व श्री काळभैरवनाथ मंदिर जीर्णोद्धारासाठी निविदा प्रसिद्ध

एमपीसी न्यूज – पिंपरीगावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणासाठी आणि श्री काळभैरवनाथ मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी निविदा प्रसिध्द केल्या असल्याची माहिती स्थायी समितीच्या माजी सभापती, नगरसेविका उषा संजोग वाघेरे यांनी दिली आहे.

पिंपरीगावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणासाठी आणि श्री काळभैरवनाथ मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी स्थायी समितीच्या माजी सभापती, नगरसेविका उषा संजोग वाघेरे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. महापालिकेने 5 मार्च रोजी या कामाच्या अनुक्रमे 83 लाख 10 हजार 333 रूपये आणि 5 कोटी 81 लाख 28 हजार 982 रूपयांच्या निविदा प्रसिध्द केल्या आहेत.

या दोन्ही कामांसाठी उषा वाघेरे यांनी मागील पाच वर्षांपासून पाठपुरावा केला होता. दिनांक 19 डिसेंबर 2014 रोजी तत्कालीन आयुक्तांना प्रभाग दौऱ्यामध्ये ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून, या दोन्ही कामांमुळे पिंपरीगांवच्या वैभवात भर पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन स्मारकांमध्ये रायगडावरील सिंहासनाधिष्ठीत पुतळयाची प्रतिकृती बनविण्यात येणार असून आकर्षक मेघडंबरी बसविण्यात येणार आहे. तसेच भैरवनाथ मंदिर नव्याने बांधून, आता ते काळ्या दगडी कामांमध्ये, आकर्षक स्वरूपात बांधण्यात येणार आहे. अशी माहिती उषा वाघेरे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.