Pune : स्वारगेट भागात सापडला भुयारी मार्ग

एमपीसी न्यूज- मेट्रोच्या भुयारी मार्गासाठी स्वारगेट येथील राजर्षी शाहू महाराज बस थानकाच्या समोरील बाजूस काम सुरु असताना एक भुयार सापडले. जमिनीत 12 ते 15 फुटावर हे भुयार आढळून आले असून हे भुयार केंव्हा बांधण्यात आले. याबद्दलची नेमकी माहिती मिळालेली नाही.

बुधवारी (दि. 27) पायलींग मशीनच्या साहाय्याने जमिनीमध्ये खड्डा घेण्याचे काम सुरु असताना बस स्थानकाच्या बाजूची जमीन खचली. त्या ठिकाणी सुमारे 8 ते 10 फुटांचा खड्डा पडला. त्यानंतर समांतर बाजूला दुसरा खड्डा घेतला असता तेथील जमीन देखील खचली. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. 28) या खड्ड्यामध्ये उतरून पाहणी केली असता या खड्ड्यामधून पूर्व आणि पश्चिम दिशेसह उत्तरेकडे भुयार जात असल्याचे आढळून आले. भुयाराच्या तिन्ही दिशेला जाऊन पहिले असता दगडी बांधकाम करून भुयारे बांधण्यात आल्याचे निदर्शनास आले.

मात्र अद्याप हे भुयार कधी बांधण्यात आले त्याबाबत माहिती मिळू शकली नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.