Bhosari : भरदिवसा 54 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज- बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने भरदिवसा घरातील 54 हजारांचा ऐवज लंपास केला. शनिवारी ( दि.30) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास भोसरीतील महादेवनगर परिसरात ही घटना घडली.

या प्रकरणी मोनाली ज्ञानेश्वर बोरसे (वय 27, रा.भोसरी) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरसे यांचे घर शनिवारी दुपारी कुलूपबंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप व काडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील 32 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे नाणे, रोख रक्कम असा 54 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच त्याच परिसरात राहणारे आशिष देसाई यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून चोरीचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक हंडाळ अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.