Pune : भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यास प्रतिसाद

एमपीसी न्यूज- भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 14 व्या वार्षिक माजी विद्यार्थी मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला . धनकवडी कॅम्पसमध्ये 20 एप्रिल रोजी हा मेळावा पार पडला.

या मेळाव्यास मालपाणी उद्योग समूहाचे संचालक आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी गिरीश मालपाणी हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (इंग्लंड) चे सल्लागार सचिन भावसार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारती अभिमत विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद भालेराव हे उपस्थित होते.

मिलिंद जगताप (सॉफ्टहार्ड ऑटोमेशन प्रा. लि.) यांना’बेस्ट अल्युमनी आंत्रप्रुनर अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. उमेश जगताप, अमित कौलगुड, दिनेश धाडवे, नितीन गोळे, अभिषेक भल्ला या यशस्वी व्यावसायिकांचाही सत्कार करण्यात आला.

गिरीश मालपाणी, सचिन भावसार, डॉ आनंद भालेराव यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले. सचिन चव्हाण यांनी स्वागत केले. प्रा.संजय लेंभे यांनी अहवाल सादर केला. प्रा. शामला शिंदे यांनी आभार मानले.

‘इंटरनेट ऑन थिंग्स एनेबल्ड इंडस्ट्रियल हेल्मेट’ या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाला माजी विद्यार्थ्यांतर्फे प्रायोजकत्व देण्यात आले. माजी विद्यार्थी संघटनेच्या अहवालाचे प्रकाशन गिरीश मालपाणी,सचिन भावसार आणि डॉ.आनंद भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.