Chakan : शस्त्रांचा धाक दाखवून दहशत पसरविणार्या 15 जणांविरोधात गुन्हा
एमपीसी न्यूज – लोखंडी कोयता आणि काठ्या दाखवत सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना दमदाटी करणाऱ्या 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चाकण येथे रविवारी (दि. 26) रात्री अकराच्या सुमारास घडला.
शुभम मस्के, संकेत गाडेकर, सलमान शेख, किरण गोतारणे, विशाल कांबळे, सनी गाडेकर, चेतन मस्के, कार्तिक देशमुख, नितीन धनवटे, रियाज शेख आणि त्यांचे पाच साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संकेत रमेश गाडेकर (वय 20, रा. चाकण) यांनी चाकण पोलिसात गुन्हा नोंदवला.
- याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अकराच्या सुमारास संकेत आणि त्यांचा मित्र चाकण बाजारपेठेतून रस्त्याने जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवून ‘कारे तुम्हाला जास्त माज आला आहे काय’ असे म्हणत मारहाण केली.
तसेच संकेत यांना शिवीगाळ करत काठी आणि लोखंडे कोयत्याने परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत चाकण पोलिसात गुन्हा दाखल केला असून चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.