Pimpri : संस्कार प्रतिष्ठानच्या मूर्तीदान उपक्रमात 24 हजार गणेश मूर्तीचे दान अन् 17 टन निर्माल्य संकलित

एमपीसी न्यूज- संस्कार प्रतिष्ठान आणि डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मूर्तीदान उपक्रमामध्ये 7 हजार 118 मूर्तींचे दान स्वीकारण्यात आले.

चिंंचवड थेरगाव पूल घाटावरील गणपतीदान उपक्रमात मराठी अभिनेत्री गिरीजा प्रभू हिने ७ व्या दिवशी सहभाग घेतला. “प्रत्यक्ष मूर्तीदान हा स्त्युत्य उपक्रम असून मी व माझा परिवार या उपक्रमात सहभागी राहिल” असे गिरीजा प्रभू हिने सांगितले. मूर्तीदान उपक्रमामध्ये गिरीजा प्रभू हिने मदत केली

मूर्तीदान उपक्रमामध्ये दिड दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी थेरगाव पूल घाट ६२३, काळेवाडी ३२५, वाल्हेकरवाडी ६७५, मोरया गोसावी १८, केशवनगर १२५ अशा एकूण १ हजार ७६६ गणेशमूर्तींचे दान स्वीकारण्यात आले. तसेच ३ टन निर्माल्य संकलित करण्यात आले.

५ व्या दिवशी वाल्हेकरवाडी घाट २८५०, थेरगाव पूल घाट ३१२०, अजमेरा कॉलनी ५२५, केशवनगर ४५, काकडेपार्क व बिर्ला हॉस्पिटल हौदातील ८५ अशा एकुण ११ हजार ०८० मूर्तींचे दान स्वीकारण्यात आले. तर एकूण ६ टन निर्माल्यदान

६ व्या दिवशी थेरगाव पुल घाट ३ हजार ३२७, काळेवाडी ४५०, काकडेपार्क १२५, मोरया गोसावी २० आणि मोशी येथील विसर्जन घाटावर ३२५ मूर्तींचे दान स्वीकारण्यात आले.

७ व्या दिवशी थेरगाव घाटावर घरगुती गणपतीच्या ५ हजार ६२३ मूर्ती, मंडळाच्या २० मूर्ती २० तसेच हौदातील २५ मूर्ती स्वीकारण्यात आल्या. तर रावेत येथून १५० मूर्ती, दिघी येथून ८०० केशवनगर येथून २५ गणेश तलाव येथून १५० तर मोरवाडी येथून ३२५ अशा एकूण ७ हजार ११८ मूर्तींचे दान स्वीकारण्यात आले. त्याचप्रमाणे व ६ टन निर्माल्य जमा केले. आजपर्यंत एकूण एकुण २४ हजार २११ मूर्ती व १७ टन निर्माल्य संकलित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.