Nigdi – भक्ती शक्ती चौकाजवळ बीआरटी मार्गात दुचाकीची ट्रकला धडक, दोघे जखमी

एमपीसी न्यूज – भक्ती-शक्ती चौकाजवळ बीआरटी मार्गात ट्रकला दुचाकीने मागून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दोन तरुण जखमी झाले. ही घटना आज (सोमवारी) दुपारी घडली.

निलेश राजू गायकवड (वय 19) आणि विकास जनार्दन घायाळ (वय 19, रा. नाणेकरवाडी, चाकण) अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुण दुचाकीवरून भक्ती-शक्ती चौकाकडून मुकाई चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून बीआरटी मार्गातून जात होते. या मार्गावरून जात असलेल्या ट्रकला दुचाकीने मागून धडक दिली. दुचाकी घसरून दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. जखमींना निगडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भक्ती-शक्ती चौकाकडून मुकाई चौकाकडे जाणाऱ्या मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील बीआरटी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तरीही या मार्गातून सर्रासपणे वाहतूक होते. बेदरकार वाहन चालवल्यामुळे या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. निगडी वाहतूक विभागाकडून या मार्गावर नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे दुचाकीस्वार बीआरटी मार्गातून प्रवास करतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.