Pune : मी बंडखोरी करणार नाही – प्रशांत जगताप
एमपीसी न्यूज – हडपसर विधानसभा मतदारसंघात मी बंडखोरी करणार असल्याची सोशल मीडियात चर्चा होती. पण, मी पक्षाशी गद्दारी करणार नाही. उमेदवार चेतन तुपे पाटील यांचे काम करणार असल्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी जगताप म्हणाले, मी 21 व्या वर्षापासून पक्षाचे काम करतो. पक्षाने मला महापौर, पीएमपीएमएलचे संचालक पद दिले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा मी निष्ठावान कार्यकर्ता आहे. ग्रामीण, शहर, राज्यात पक्षाचा प्रचारासाठी फिरणार आहे, असेही जगताप यांनी सांगितले.