Pune : रितू प्रकाश छाब्रिया यांचा ‘आयईबीएफ एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मान

एमपीसी न्यूज – इंडो-युरोपियन बिजनेस फोरमच्या वतीने हाऊस ऑफ लॉर्ड, लंडन येथे झालेल्या सोहळ्यात फिनोलेक्स इंडस्ट्रीज संलग्नित मुकुल माधव फॉउंडेशनच्या (एमएमएफ) व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांना ‘आयईबीएफ एक्सलन्स अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या प्रतिष्ठित पुरस्काराने रितू छाब्रिया यांना सन्मानित करण्यात आले.

हाऊस ऑफ लॉर्ड येथे झालेल्या या सोहळ्यात बॅरोनेस सँडी वर्मा, लॉर्ड लुम्बा, लॉर्ड ढोलकिया, माजी क्रिकेटपटू कपिलदेव, अभिनेते सुनील शेट्टी, वैभव डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या क्षेत्रात रितू छाब्रिया यांनी आरोग्य, शिक्षण युवक व क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. छाब्रिया यांच्यासह देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला. रितू छाब्रिया यांनी आपल्या भाषणात ‘आयईबीएफ’चे या पुरस्काराबद्दल आभार व्यक्त करत या सन्मानाने अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे, असे सांगितले.

“समाजात दीर्घकालीन बदल घडवण्यासाठी आणि या बदलाची परंपरा निर्माण करण्यासाठी, तसेच समाजाच्या वंचित घटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘सीएसआर’ हा अतिशय प्रभावी मार्ग आहे. आपण हे कार्य परस्पर सहकार्यानेच करत आहोत. या पुरस्काराने आमच्या प्रयत्नांना प्रोत्साहन आणि बळ मिळाले” असल्याची भावना रितू छाब्रिया यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.