Pune : भाजपचा काँगेस-राष्ट्रवादी-पुरोगामी संघटनेतर्फे निषेध

एमपीसी न्यूज – लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या भाजपचा काँगेस – राष्ट्रवादी – पुरोगामी संघटनेतर्फे आज निषेध करण्यात आला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी सकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नेमणूक केली. संविधानाचे पालन न करता सर्व नियम धाब्यावर ठेवून केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर राज्यपालांनी घाईगडबडीने त्यांची नियुक्ती केली. त्याच्या निषेधार्थ पुण्यातील सर्व पुरोगामी संघटना, काँगेस – राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पक्ष, हमाल पंचायत व जनवादी महिला संघटनांनी बालगंधर्व चौकात आंदोलन केले.

डॉ. बाबा आढाव, प्रा. अजित अभ्यंकर, रविंद माळवदकर, सुभाष वारे, किरण मोघे, राहुल डांबाळे यांची  भाषणे झाली. ऍड. अभय छाजेड यांनी आभार मानले. रमेश अय्यर, विठ्ठल गायकवाड, सचिन आडेकर, सुजित यादव, चैतन्य पुरंदरे, अनिस खान, राहुल तायडे, साहिल राऊत, वसंत पवार आणि पुरोगामी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रमेश बागवे म्हणाले, भाजपने असे कृत्य करून लोकशाहीला काळिमा फासला आहे. अशा प्रकारचे कृत्य भाजपने कर्नाटक, अरुणाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यांतही असेच कृत्य केले होते. त्यावेळी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या निर्णयावर आक्षेप घेतले होते. भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी 7 दिवसांची मुदत जाणून बुजून दिली आहे. या निर्णयामुळे भाजपला घोडेबाजार करायला पुरेसा वेळ मिळालेला आहे. लोकशाही व संविधान टिकविण्यासाठी काँगेस आंदोलनात सहभागी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.