Hinjwadi : तरूणाकडून चार किलो गांजा जप्त
एमपीसी न्यूज – विक्रीसाठी गांजा घेऊन आलेल्या तरूणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने बावधन येथून अटक केली. त्याच्याकडून एक लाखांचा चार किलो गांजा, एक दुचाकी असा दीड लाखांचा ऐवज जप्त केला.
दिनेश सोपान काळे (वय-28, रा. स्वामी समर्थ नगर, कोंढवा), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस हवालदार राजन गोविंद महाडीक (वय-52) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश बावधन येथील सार्वजनिक रस्त्यावर गांजा विक्रीसाठी आला होता. याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 98 हजार 75 रूपयांचा 3 किलो 973 ग्रॅम गांजा 55 हजारांची एक दुचाकी, रोकड असा 1 लाख 53 हजार 295 रूपयांचा ऐवज जप्त केला.