Talegaon Dabhade : प्रगतीशील शेतकरी, बैलगाडा मालक बबनराव मराठे यांचे निधन
एमपीसी न्यूज – वराळे येथील प्रगतीशील शेतकरी आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक बबनराव हिरामण मराठे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.
त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, तीन मुले, पाच मुली असा परिवार आहे. बबनराव मराठे यांचा मनमिळाऊ स्वभाव होता. तसेच त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यांत नेहमी सहभाग असायचा.
माजी सभापती धोंडिबा मराठे त्यांचे बंधू तर, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे त्यांचे पुतणे व गणेश मराठे त्यांचे पुत्र होत. अंत्यविधी आज रविवार (दि.23) सकाळी साडे अकरा वाजता इंद्रायणीकाठी होणार आहे.