Sangvi : मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवून महिलेचा विनयभंग
एमपीसी न्यूज – महिलेच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवून महिलेचा विनयभंग केला. याबाबत एका अनोळखी इसमाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 29 फेब्रुवारी रोजी सकाळी वाकड येथे घडली.
याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 9527955353 या मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्यांच्या मोबाईल फोनवरून फिर्यादी यांच्या फोनवर अश्लील व्हिडिओ पाठवला. याबाबत फिर्यादी यांनी मोबाईल क्रमांक धारक अनोळखी व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.