Pimpri: नागरिकांनो, घरीच बसा, प्रशासनाला सहकार्य करा – श्रावण हर्डीकर

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसें-दिवस वाढत आहे. त्यामुळे अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. रुग्ण वाढण्याची सुरुवात झाली आहे. रुग्ण संख्या कधीही वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. घरातच रहावे. प्रशासनाला सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. नागरिकांनी घरी वातानुकूलन यंत्रणेचा वापर टाळावा, असेही आवाहन त्यांनी केले.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 89 वर पोहचली आहे. दररोज संख्या वाढत आहे. आता तिसरा टप्पा सुरु झाला आहे. संसर्गाने कोरोनाची लागण होण्याची भिती वाढू लागली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधितांचा आकडा 12 आहे. पिंपरी-चिंचवड शहर लॉकडाऊन केले आहे. शहरात कलम 144  लागू झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहरात 12 रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आहेत. त्यांच्यावर महापालिका रुग्णालयात ‘आयसोलेशन’ कक्षात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. महापालिकेने पाठविले रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. महापालिकेने खबरदारी घेऊन परदेशातून आलेल्या 910 नागरिकांना ‘होम क्वारंटाईन’ केले आहे. आता कोरोनाचे रुग्ण वाढण्याची सुरुवात झाली आहे. कधीही रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. घरातच रहावे. महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे. महापालिका प्रशासन सर्व उपाययोजना करत आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.