Pimpri: खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग उभारावा, महापालिकेचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्दी, ताप, खोकला असणा-या रुग्णांची तपासणी करण्यासाठी महापालिका हद्दीतील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग उभारावा. रुग्णालया बाहेरिल स्वतंत्र मोकळ्या हवेशीर ठिकाणी वेगळा विभाग करुन  रुग्णांची तपासणी करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. फ्लूसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. यासाठी महापालिकेच्या दवाखाने व रुग्णालये याठिकाणी स्वतंत्र बाह्य रुग्ण विभाग कार्यान्वीत करण्यात आलेला आहे. याशिवाय  महापालिका कार्यक्षेत्रातील खासगी वैद्यकीय व्यवसायिक यांना त्यांचे रुग्णालया बाहेरिल स्वतंत्र मोकळ्या हवेशीर ठिकाणी सर्दी, ताप, खोकला असणा-या रुग्णांसाठी वेगळा बाह्यरुग्ण विभाग उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या भीतीमुळे खासगी रुग्णालये, ओपीडी बंद ठेवण्यात येत आहेत. वैद्यकीय व्यावसायिकांनी आपत्तीच्या काळात रुग्णालये, ओपडी, त्यांच्या सेवा सुरळतीपणे सुरु ठेवाव्यात. अन्यथा डॉक्टर, वैद्यकीय व्यावसायिक यांच्यावर कारवाई केली जाईल. याशिवाय नोंदणी रद्द करण्याकरिता इंडियन मेडिकेल कौन्सीलकडे तक्रार करण्याचा इशारा यापूर्वीच विभागीय आयुक्तांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.