Pune : दिवसभरात 107 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 4 मृत्यू; 53 ठणठणीत बरे
एमपीसी न्यूज : कोरोनाला अजूनही आवर घालता आलेला नाही. पुण्यात रोज सरासरी 90 रुग्ण दाखल होत आहेत. आज 2 मे रोजी दिवसभरात 107 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. दरम्यान, आज कोरोनाबाधित चार रुग्णांचा मृत्यू झाला.
त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाचा संसर्ग झालेले 53 रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत पुण्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1718 असून अॅक्टिव्ह रुग्ण संख्या1,246 आहे. पुणे महापालिका हद्दीत 94 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या 67 रुग्णांची प्रकृती गुंतागुंतीची झाली असून 11 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने पुणेकरांना लॉकडाऊनमधून मोठी सूट मिळेल असे दिसत नाही.