Pune : जीवनावश्यक किटमध्ये 70 लाख रुपयांचा भ्रष्टाचार : मनसे

Corruption of Rs 70 lakh in essential kit: MNS

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेतर्फे पुरविण्यात येणाऱ्या जीवनावश्यक किटमध्ये सुमारे 70 लाख  रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेतर्फे करण्यात आला आहे. सोमवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी किटमधील वस्तूंच्या किंमती आणि बाजारातील किंमतीची तफावत आयुक्तांच्या समोर मांडली.

त्यामुळे प्रत्येक किटमागे सुमारे 91 रुपये जादा, असे 60 ते 70 लाख रुपयांचा भ्रष्टाचार  किटमध्ये झाला, अशी माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली.

पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. कंटन्मेंट झोनमध्ये महापालिकेतर्फे गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटण्यात येत आहे. जीवनावश्यक किटमधील 12 वस्तूंपैकी 6 वस्तू या बाजारामध्ये कमी किंमतीत उपलब्ध असताना, त्या चढ्या भावाने खरेदी करण्यात आल्या आहेत, असे मनसेचे शहराध्यक्ष विशाल शिंदे, सचिव योगेश खैरे, संतोष पाटील यांनी सांगितले.

किटमधील आटा, तेल, पोहे, मीठ, साबण यांची जादा दराने खरेदी  करण्यात आली आहे. सनफ्लॉवर  रिफाईंड  तेलाचा उल्लेख करून सोयाबीन तेल दिले. पोह्यांचा आणि मीठाचा भावही चार व पाच रुपयांनी अधिकचा लावला गेला आहे.

कंटेन्मेंट झोनमध्ये 70 हजार किट वाटप करणार आहेत. त्यामुळे कोणत्याही सर्व वस्तू पॅकिंग करून पुणे महापालिकेकडे पोच केल्या असत्या. मात्र, घाऊक बाजारातून हा माल खरेदी करण्यात आला. ट्रान्सपोर्ट, पॅकिंग आणि नफा असा प्रत्येक किटमागे दहा रूपये जास्तीचे लावण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.