Talegaon Dabhade: भातपिकासाठी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा

Talegaon Dabhade: Farmers wait for heavy rains for paddy crop या पावसामुळे धूळवाफेवर खरीप भात ज्या शेतकऱ्यांनी पेरले होते. त्याची उगवण अतिशय चांगली झाली आहे.

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील खरीप भात पिकांच्या रोपांच्या पेरण्या काही शेतकऱ्यांनी धूळ वाफेवर आणि निसर्ग चक्रीवादळापूर्वी केल्या होत्या. त्याची उगवण अतिशय चांगली झालेली असून या रोपांच्या अधिकच्या वाढीसाठी शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

मावळ तालुका हा अतिपावसाचा आणि खरीप भातपीक उत्पादन असलेला प्रमुख तालुका आहे. मान्सूनच्या पावसावरच खरीप भातपीक घेणारा तालुका असल्याने येथील काही शेतकऱ्यांनी मान्सून पूर्व वळवाच्या पावसावर तर काही शेतकऱ्यांनी धूळ वाफेवर भात पिकाच्या रोपांच्या पेरण्या केलेल्या होत्या.

गेल्या आठवड्यात निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण मावळ तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. सर्वच विभागात दोन दिवस मुसळधार पाऊस पडला.

या पावसामुळे धूळवाफेवर खरीप भात ज्या शेतकऱ्यांनी पेरले होते. त्याची उगवण अतिशय चांगली झाली आहे. शेतकरी आता या रोपांच्या पुढील मशागतीच्या कामाला लागला असल्याचे शिळाटणे येथील प्रगतीशील शेतकरी गणपत भानुसघरे यांनी सांगितले.

यावर्षी तालुक्यात 13 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर खरीप भात घेण्याचे नियोजन तालुका कृषी विभागाने केले असल्याचे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे व पंचायत समितीचे कृषी अधिकारी संताजी जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.