Pimpri: पिंपरी, भोसरी, चाकण येथून दोन लाखांच्या सहा दुचाकी चोरीला

Pimpri: Six two-wheelers worth Rs 2 lakh were stolen from Pimpri, Bhosari and Chakan याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात सोमवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एमपीसी न्यूज- पिंपरी परिसरातून दोन, भोसरी परिसरातून दोन आणि चाकण परिसरातून एक अशा एकूण एक लाख 90 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात सोमवारी (दि.22) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुचाकी चोरीची पहिली घटना रविवारी (दि.21) सकाळी महेशनगर, पिंपरी येथे उघडकीस आली. याबाबत ऋषिकेश राधाकिशन ठोंबरे (वय 23, रा. महेशनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ठोंबरे यांनी त्यांची 50 हजार रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी (एमएच 14 एचएल 7688) आणि ठोंबरे यांचे मित्र किरण गुंजाळ यांची 50 हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी (एमएच 14 एवाय 4806) या दोन्ही दुचाकी शनिवारी (दि.20) रात्री सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केल्या होत्या. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्या.

दुचाकी चोरीची दुसरी घटना रविवारी (दि.21) दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास उद्यमनगर, पिंपरी येथे उघडकीस आली. याबाबत आशिष अशोक कुमार दास (वय 27, रा. अंतरीक्ष रोड, उद्यमनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दास यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी (एमएच 14 ईडब्ल्यू 9860) त्यांच्या राहत्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये गुरुवारी (दि.18) रात्री पार्क केली होती.

अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार तीन दिवसानंतर रविवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमरास उघडकीस आला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

दुचाकी चोरीचा तिसरा प्रकार 13 जून रोजी सकाळी मोहननगर, भोसरी येथे उघडकीस आला. याबाबत संग्राम संपत लांडगे (वय 30, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लांडगे यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एमएच 14 डीवाय 5081) 12 जून रोजी रात्री साडेआठ वाजता मोहननगर भोसरी येथे त्यांचे मित्र विकास वाघमारे यांच्या घरासमोर पार्क केली.

रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 13 जून रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमरास उघडकीस आला.

दुचाकी चोरीचा चौथा प्रकार रविवारी (दि.21) सकाळी गणेशनगर, दापोडी येथे उघडकीस आला. याबाबत रामचंद्र लक्ष्मण जाधव (वय 52, रा. गणेशनगर, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी शनिवारी (दि.20) सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्या राहत्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली.

रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

दुचाकी चोरीचा पाचवा प्रकार 14 जून रोजी सकाळी चाकण येथील माणिक चौकात उघडकीस आला. याबाबत सुरज दीपक पौळ (वय 21, रा. सोमवार पेठ, सदानंदनगर, पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पौळ यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 12 जेटी 5710) चाकण येथील माणिक चौकात हनुमान मंदिराच्या शेजारी 14 जून रोजी सकाळी पार्क केली होती.

अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी भरदिवसा चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.