Pimpri: विद्यार्थ्यांना संगणक, लॅपटॉप खरेदीसाठी गजानन लोकसेवा सहकारी बँकेचे 50 हजारांपर्यंत शैक्षणिक कर्ज

Pimpri: Gajanan Lokseva Sahakari Bank offers up to Rs 50,000 education loan to students for purchase of computers and laptops कोरोना महामारीच्या काळात शहरातील अनेकांची नोकरी गेली. तसेच नागरिकांना विविध आर्थिक अडचणींचा सामना करवा लागला. अशात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

एमपीसी न्यूज- संगणक व लॅपटॉपची उपलब्धता नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना संगणक, लॅपटॉप खरेदीसाठी गजानन लोकसेवा सहकारी बँकेने 50 हजारांपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

गजानन लोकसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

बाबर म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात शहरातील अनेकांची नोकरी गेली. तसेच नागरिकांना विविध आर्थिक अडचणींचा सामना करवा लागला. अशात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, संगणक, लॅपटॉपची उपलब्धता नसल्यामुळे अनेकांना ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेता येत नाही.

या विद्यार्थी व पालकांची अडचण लक्षात घेऊन गजानन लोकसेवा सहकारी बँकेने विद्यार्थ्यांना संगणक, लॅपटॉप खरेदीसाठी 50 हजारांपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

सुलभ प्रक्रियेद्वारे उपलब्ध असलेल्या या शैक्षणिक कर्ज योजनेचा पिंपरी-चिंचवड शहरांमधील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी खासदार व गजानन लोकसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.