SSC RESULT: दहावीचा निकाल कधी लागणार ?

SSC RESULT: When will the result of X be available, no clarity लॉकडाऊनमुळे दहावीचा शेवटचा भुगोलाचा पेपर रद्द झाल्याने पेपर तपासणीची प्रक्रिया देखील लांबली होती. त्यामुळे यंदा दहावीचे निकाल लांबले होते.

एमपीसी न्यूज – सीबीएसई बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर होऊन एक आठवडा ओलंडला. राज्यातील बारावीच्या परिक्षांचे निकाल देखील जाहीर झाले. आता दहावीचे निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल गेल्या आठवड्यात लागला. पण दहावीचा निकाल अजून लागलेला नाही. लॉकडाऊनमुळे दहावीचा शेवटचा भुगोलाचा पेपर रद्द झाल्याने पेपर तपासणीची प्रक्रिया देखील लांबली होती. त्यामुळे यंदा दहावीचे निकाल लांबले होते.

दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. परंतु, अद्याप महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

3 मार्च ते 23 मार्च या काळात आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेसाठी राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यी परिक्षेला बसले होते. राज्यातील एकूण 22 हजार 586 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती, तर 4979 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.

मागच्या वर्षी 8 जूनला दहावीचा निकाल लागला होता. यावर्षी जुलै संपायला आला तरी अजून निकालाची तारीख जाहीर झाली नसल्याने विद्यार्थी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.