Bhosari : अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, सांस्कृतिक भवनाचे उदघाटन

जेष्ठ नागरिकांचा संविधान व फकिरा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. Honor of meritorious students on the occasion of Annabhau Sathe Jayanti, inauguration of Sanskritik Bhavan

एमपीसीन्यूज : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंती निमीत्त 10 वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थांचा गुणगौरव व जेष्ठ नागरिकांचा संविधान व फकिरा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवनाचे उदघाटन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष संदिपान झोंबाडे, आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष- खाजाभाई शेख, पश्चिम महाराष्ट्र सचिव सुधाकर वारभुवन, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव साळवे, दत्तु लोंढे यांच्या हस्ते या सांस्कृतिक भवनाचे उदघाटन करण्यात आले.

लांडेवाडी- फुलेनगर प्रभाग क्रमांक 20 चे प्रभाग अध्यक्ष अक्षय दुनघव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी आशा पवार, रेखा थोरात, रेखा जाधव, रत्ना थोरात, स्मिता दिवार,आशा शिंदे , कांचन दुनघव, शकुंतला दुनघव, संगिता पाटील, संजिवनी सिरसाट, नानी वाघमारे, बबई गव्हाळे, वाघा जाधव, कृष्णा उदागे, अक्षय शिंदे, दत्ता दुनघव, मोहन दुनघव, गोरख भडकुंभे, राहुल काटे, विलास माने, मनोहर शिंदे, बाळू शिंदे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.