Pune Corona News: 1290 नवे रुग्ण, 1961 जणांना डिस्चार्ज तर 50 जणांचा मृत्यू
एमपीसी न्यूज – पुणे शहरात आजही (शनिवारी) नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. दिवसभरात शहरात 1 हजार 290 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली त्याच वेळी 1 हजार 961 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दिवसभरात शहरात 50 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी 13 रुग्ण हे शहराबाहेरील होते.
शहरात आज 5 हजार 051 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 1 हजार 290 जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत शहरात 64 हजार 576 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी 46 हजार 735 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
शहरात सध्या 16 हजार 325 सक्रिय कोरोना रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यापैकी 717 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून 443 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.