Pimpri : माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

याबाबत सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याबाबत सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती परवेज मोईन शेख (वय 30), दीर अनिस मोईन शेख (वय 40), दीर इलियास मोईन शेख (वय 38), दीर नजीर मोईन शेख (वय 35), जाऊ रजिया नजीर शेख (वय 33), दीर जावेद मोईन शेख (वय 24), दीर आसिफ मोईन शेख (वय 21), सासरे मोईन खेतई शेख (वय 60, सर्व रा. बालामल चाळ, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनी आपसात संगनमत करून फिर्यादी सासरी नांदत असताना त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला.

तसेच फिर्यादी विवाहीतेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत भारतीय दंड विधान कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.