Pune News: माजी केंद्रीय सचिव पद्मभूषण डॉ. पद्माकर दुभाषी यांचे निधन

डॉ. दुभाषी यांनी राज्य व केंद्र शासनात 40 वर्षे विविध पदांवर काम केले. गोवा विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते.

एमपीसी न्यूज – भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे अध्यक्ष, माजी केंद्रीय सचिव पद्मभूषण डॉ. पद्माकर रामचंद्र दुभाषी यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.

दुभाषी यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगा, कन्या, सून, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. दुभाषी यांनी राज्य व केंद्र शासनात 40 वर्षे विविध पदांवर काम केले. गोवा विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

प्रशासकीय सेवेबद्दल त्यांना 2010 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सोमवारी दुपारी त्यांच्यावर वैकुंठ स्मशाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.